मुंबई

मुंबई- गोवा क्रूझवर एनसीबीची कारवाई, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात

मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईहून गोव्याला निघालेल्या मोठ्या क्रूझवर कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली आहे. एनसीबीची ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुमारे ७ तास सरू होती अशी माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी केली जात आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत. आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले की त्याला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं.

मुंबई-गोवा क्रूझमध्ये रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीचे एक पथक या क्रूझवर पोहोचले होते. ही क्रूझ समुद्राच्या मध्यमागी पोहोचल्यानंतर क्रूझवर ड्रग पार्टी सुरू झाली. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केली. एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे.

एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, आर्यन खानने चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेली नसून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago