मुंबई

आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आज मुंबईतील किल्ला कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल.

कालची रात्र आर्यनसह इतर आरोपींनी तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले, तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. आर्यनसह इतर आरोपींना ३- ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान, निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीने सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आर्यनच्या वकिलांनी सांगितलं आहे.

आर्यन खानची याचिका मुंबईच्या किल्ला कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले की, त्यांना या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आणि जामिनावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. हा अर्ज सत्र न्यायालयात करायला हवा होता. युक्तिवादादरम्यान, मानेशिंदे यांनी आर्यन खानला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी केली. त्यासाठी त्यांनी कोर्टाला एकूण 22 निकालांचा हवाला दिला. तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, असेदेखील ते म्हणाले. आरोपींना जामीन देण्याबाबत जे अधिकार हायकोर्ट आणि सेशन कोर्टला आहेत. तेच अधिकार महानगरीय कोर्टालाही आहेत. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅमदेखील ड्रग्ज सापडलेले नाही. म्हणून जामीन मिळावा. आर्यन खानकडे चॅटशी निगडित मटेरियल सापडलं आहे. तो जामिनास पात्र आहे.

ते पुढे म्हणाले की आरोपी जामिनावर असूनसुद्धा चौकशीला सहयोग करू सकतो. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा चौकशीसाठी यायला तयार आहे, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला. तर NDPS Act नुसार दाखल केलेले सर्व गुन्हे हे अजामीनपात्र आहेत, असा दावा एनसीबीतर्फे वकील एएसजी सिंग यांनी केला. हा युक्तिवाद तब्बल अडीच तास चालला. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago