मुंबई

हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महाप्रित आणि स्टेनबीस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्रात इंडो – जर्मन हायड्रोजन ऊर्जा उद्योग आणि तंत्रज्ञान विकास साधण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कंपनीद्वारे स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडिया (2E नॉलेज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एक युनिट) यांच्यात हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी, महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महाप्रितचे कार्यकारी संचालक (प्रशासन) धनंजय कमलाकर, प्रशांत गेडाम, महाप्रितचे कार्यकारी संचालक (संचालन) सुनील जी पोटे, मुख्य महाव्यवस्थापक – इमर्जिंग टेक्नोलॉजी उमाकांत धामणकर, व्यवस्थापकीय संचालकांचे तांत्रिक सल्लागार विजय माहुलकर, स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनीतकुमार गोयल आणि गिरीश अरलीकट्टी उपस्थित होते.

या करारामुळे भारतीय आणि जर्मन उद्योगांमध्ये हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकास, हस्तांतरण, प्रशिक्षण आणि कौशल्य निर्मितीची प्रक्रिया सुलभ होईल. ग्रीन हायड्रोजनचा वापर अधिक प्रचलित व सुलभ व्हावा यासाठी राज्याला भारत व जर्मनीमधील स्टार्टअप्स, संशोधन आणि विकास संस्था यासह तज्ज्ञांचे सहकार्य मिळावे, हे महाप्रितचे मुख्य उद्दिष्ट आहे.

शाश्वत विकासासाठी एक स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजन महत्त्वाची भूमिका बजावतो. ऊर्जा साठवण आणि शाश्वत वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी हायड्रोजन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. एक अक्षय ऊर्जास्रोत, झिरो एमिशन वाहनांसाठी इंधन आणि उद्योगांसाठी आधारभूत सामग्री म्हणून हायड्रोजनचा वापर महत्त्वाचा आहे. “महाप्रितद्वारे विविध हरित हायड्रोजन प्रकल्पांचे नियोजन केले जात असून त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे सहकार्य या सामंजस्य करारामुळे मिळणार आहे. स्टेनबीस कंपनीचा हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रातील अनुभव आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या मदतीने हरित हायड्रोजनची निर्मिती, त्याची साठवणूक आणि वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. येत्या काळात महाप्रितद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या या हरित हायड्रोजन प्रकल्पांमुळे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या लाभार्थींसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.” असे श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले.

“महाप्रितच्या सहकार्याने इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञान, हायड्रोजन तंत्रज्ञानाशी निगडित गतिज ऊर्जा पर्याय, बायोमेथेन/मिथेनॉल यांचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर, घनकचरा प्रक्रियेतून सिंथेसिस गॅसची निर्मितीवर लक्ष केंद्रित करू. महाराष्ट्रात हायड्रोजन क्लस्टरचा विकास हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago