मुंबई

मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९ व्या मजल्यावर एकत्रित आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सामान्यांना एकाच ठिकाणी ही कार्यासने उपलब्ध होणार असल्याने त्यांना विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

नवीन प्रशासन भवन इमारतीमधील सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यातील जागेच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर असलेल्या ऊर्जा विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या रोख शाखेस याच इमारतीतील बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूकडील सामान्य प्रशासन विभागाची जागा देण्यात आली आहे.

१९ व्या मजल्यावरील पूर्व बाजूस असलेले प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीस (कृषि व पदुम विभाग) नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या सामान्य प्रशासन विभागाची व त्याच्या बाजूला असलेल्या कृषि व पदुम विभागाच्या गोदामाची जागा वाटप करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागास बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजू व नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या जागेच्या बदल्यात १९ व्या मजल्यावर पश्चिम बाजूस ऊर्जा विभाग व राज्य निवडणूक आयोगाची (रोखशाखा) पूर्व बाजूची प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीची (कृषि व पदुम विभाग) जागा देण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago