मुंबई

मुंबईला पावसाने झोडपलं, वाहतूक ठप्प, कांदिवलीत दरड कोसळली

मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे.

आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचलं आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्याने हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी सबवे, मालाड सबवे, मिलन सबवे, किंग सर्कल, शिंदेवाडी, दादर टीटी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

कांदिवली परिसरात पश्चिम द्रुतगती मार्गालगत दरड कोसळली. रस्त्यावर माती आणि दगडांचा ढीग साचला असून मिरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचं काम सुरु आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago