मुंबई

अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्त्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अशावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. दिंडोशीनगर, गोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे आयोजन ‘गऊ भारत भारती’ या गायीच्या संवर्धनाला समर्पित वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले.

रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण तसेच गोमूत्र यांचा वापर करून एक एकर पर्यंत शेती करण्याचा प्रयोग देशात यशस्वीरीत्या झाला असल्याचे नमूद करून लोकांनी गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी तसेच गौ आधारित उत्पादने वापरावीत, असे आवाहन राज्यपालांनी केले. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गाय महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

गायीपासून मिळणारी केवळ दोन-चार उत्पादनेच अधिकांश लोकांना माहिती आहेत असे सांगून गौउत्पादनांची मागणी निर्माण करून गो-पालक व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘गऊ भारत भारती’चे संपादक तसेच महोत्सवाचे निमंत्रक पत्रकार संजय ‘अमान’ यांनी यावेळी सांगितले. युवती व लहान मुलींनी यावेळी श्रीकृष्ण लीलांवर आधारित नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते गोसेवा कार्यास योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महेंद्र काबरा, संतोष शहाणे, राम कुमार पाल, संजय बलोदी ‘प्रखर’, हरीश बोरा, आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago