मुंबई

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली, शोध आणि बचावकार्य सुरू

मुंबई : कुर्ला पूर्व येथील नाईक नगर येथे सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला याविषयी माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सात फायर ट्रक, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. अग्निशमन दलाने सुमारे 20 जण आत अडकल्याची शक्यता वर्तवली आहे.

अग्निशमन दलाने बीएमसीला बचाव प्रक्रियेत मदत करण्यासाठी डंपर, उत्खनन यंत्र पाठवण्यास सांगितले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी शोध आणि बचाव सुरू केले आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते आठ तास लागतील. आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, याविषयी नगरसेविका प्रविणा मोरजकर म्हणाल्या, चार मोडकळीस आलेल्या इमारतींची ही वसाहत असून त्यांना पाच ते सहा वर्षांपूर्वी इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही रहिवासी येथेच राहिले. सोमवारी रात्री एक इमारत कोसळली. अग्निशमन दल येण्यापूर्वीच पाच ते सहा जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं होतं. जखमींना रुग्णालयात पाठवले जात असून उपचार करण्यात येत आहेत.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago