मुंबई

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान, किडनी, कॉर्निया, हृदय, छोटे आतडे यांचे दान

मुंबई : कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

मुंबईच्या अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांना जे. जे. रुग्णालयात १५ मे पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेंदू सर्जरी विभागप्रमुख डॉ. वर्णन वेलहो यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते. काल १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी श्रीमती बनसोडे यांना ब्रेन डेड घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना समाजसेवा विभागामार्फत संपूर्ण माहिती देऊन अवयवदानाबद्दल अवगत करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरु केली. रुग्णाच्या किडनी, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान झाले. मुंबईमधील जे. जे. हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल येथील गरजु रुग्णांना नियमानुसार हे अवयव देण्यात आले.

विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या हॉस्पीटलमधील गरजू रुग्णाला छोटया आतड्याची अत्यंत आवश्यकता होती आणि हे छोटे आतडे लगेचच मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या रुग्णास लाभ झाला असे सूत्रांनी सांगितले. झेडटीसीसीच्या नियम आणि मार्गदर्शक सुचनेनुसार कोवीड-१९ नंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या मृत्युनंतरही आपण इतरांचे जीवन वाचवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समाजसेविका असलेल्या अॅड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना समाजासमोर ठेवून गेल्या. त्यांच्या नातेवाईकांनीही या अवयवदानात मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago