Preservation and Promotion of Marathi Language at International Level
मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कामासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आदेश राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनी काढले आहेत.
परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याद्वारे संवाद वाढून परदेशात मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
भारत समन्वयक पदी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभिषेक सूर्यवंशी (अमेरिका), निवेदिता पानवलकर (अमेरिका), शोभा घुले (ऑस्ट्रेलिया), अमित वाईकर (थायलंड), निरंजन गाडगीळ (जपान), राहुल उरुणकर (केनिया), दीपक शिंदे (चीन), सचिन गांजापूरकर (सिंगापूर), मनोज कुलकर्णी (हाँगकाँग), शिल्पा गडमडे-मुळे (जर्मनी), गणेश गिते (आयर्लंड), अमोल सावरकर (स्वित्झर्लंड), प्रवीण कांबळे (युनायटेड किंगडम), मेघना वर्तक (दुबई), दयानंद देशपांडे (न्यूझिलंड), शैलेश असोंदेकर (सौदी अरेबिया), प्रशांत गिरबाने (भारत) यांची उपसमन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
परदेशात स्थायिक झालेले मराठी भाषिक तेथे मराठी भाषेच्या संदर्भात विविध उपक्रम, कार्यक्रम करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. जगातील अनेक देशांतील मराठी भाषिकांसाठी उपक्रम राबविण्याची तरतूद राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमध्ये आहे. या संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९ मध्ये अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, कलम क्र. १३ मध्ये अन्य राज्यांत व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे आणि कलम क्र. १६ मध्ये स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गांनी संस्थेचा राखीव निधी वाढविणे या उद्दिष्टांचा समावेश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९, १३ व १६ मध्ये नमूद केल्यानुसार, अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, अन्य राज्यांत व परदेशांत असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे, स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढवणे या उद्दिष्टांना निश्चित दिशा देण्यासाठी, परदेशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणाच्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक / उपसमन्वयक यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…