मुंबई

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा 11 व 12 रोजी दीपावली मेळावा

मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ
मंत्री लोढा म्हणाले, महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ या मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात शंभर महिला बचतगट सहभागी होणार आहेत. स्वयंसहाय्यता बचतगटांच्या कार्यक्षेत्रीय स्तरावरील अडचणी जाणून घेणे, त्यांना बचतगट मेळाव्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बचतगटांना ऑनलाईन साहित्य विक्री करता यावी, याकरिता जागतिक बाजारपेठेतील कंपन्याचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, सदा सरवणकर यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. यशस्वी उद्योजकांचा सन्मान, बचतगटातील महिलांना उद्योजक व्यवसायिक साहित्य वाटप, प्रातिनिधिक बचतगटांना (बँक कर्ज) धनादेश वाटप, यशस्वी उद्योजक महिलांचे अनुभव कथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बचतगटांचे स्टॉल व मान्यवरांचे मार्गदर्शन
१२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ या कालावधीत महिलांकरिता विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती, कौशल्य विकास, बँकांकडील पतपुरवठा सेवा व बाजारपेठ, विविध शासकीय महामंडळे यांच्या महिला बचत गटांसाठी असलेल्या कर्ज योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. महिला बचतगट उत्पादित विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याच्या विक्रीकरिता स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. माविम ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. तरी बचतगटांच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

17 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago