मुंबई

मुंबईत खळबळ! कॉलेजमधील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, शिक्षिकेला अटक

मुंबई : मुंबईतील एका नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला शिकवत होती. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली आणि जानेवारी 2024 मध्ये शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याकडे पहिल्यांदा लैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र, यासाठी विद्यार्थी तयार नव्हता, त्याने तिला टाळायला सुरुवात केली. मात्र, शिक्षिकेने माघार न घेता तिच्या एका मैत्रिणीला विद्यार्थ्याला फोन करायला लावला. त्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितले की, मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य झाले आहेत. “ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात.

मैत्रिणीच्या फोननंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांतात नेले, त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी हा विद्यार्थी सतत तणावात राहू लागला, विद्यार्थ्याला खूप anxiety येऊ लागली, त्यामुळे शिक्षिकेने त्याला anxiety कमी होण्याची औषधे देखील दिली. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि विमानतळाजवळ नेऊन अनेकवेळा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका त्याला अनेकदा दारू देखील पाजत असे.

दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला आणि त्यांनी त्याला त्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी विचार केला की काही महिन्यांत त्याची बारावी पूर्ण होईल, त्यानंतर तो शाळा सोडणार आहे, त्यामुळे त्यांनी याबद्दल वाच्यता न करण्याचे ठरवले. त्यांना वाटले की शिक्षिका त्याला त्रास देणे थांबवेल. मात्र, यावर्षी मुलाने बोर्डाची परीक्षा पास केली आणि तो शाळेतून बाहेर पडला. पण तो नैराश्यात गेला होता. यादरम्यान, शिक्षिकेने त्याला पुन्हा एकदा भेटायला बोलावले. आता मात्र पीडित मुलाच्या कुटुंबीयांचा संयम संपला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO Act), 2012 च्या कलम 4 (लैंगिक अत्याचार), कलम 6 (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि कलम 17 (गुन्ह्यासाठी मदत करणे) तसेच भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago