मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन, सीए परीक्षेत पटकावला देशात पहिला क्रमांक

मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.

‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक आणि नेहमीच्या अशा क्षेत्रांबरोबरच सनदी लेखापाल हे क्षेत्र व्यापार, उद्योग या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये मीत यांनी घवघवीत यश मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशात शहा कुटुंबियांचे पाठबळही महत्वपूर्ण ठरले असेल, त्यासाठी शहा कुटुंबियांचेही अभिनंदन ‘ असे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago