मुंबई

मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटके यांनी मानले आभार

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. थोड्याच वेळात ते प्रत्यक्ष अर्ज मागे घेणार आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल, त्यांचे सर्वांशी असणारे सहकाराचे नाते, यामुळे आज मला हा आशीर्वाद मिळाला. सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत होते. सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानू इच्छिते. माझ्या पतींनी नेहमी जनसेवा केली. माझाही ध्यास अंधेरीचा विकास हाच असेल. भाजपचेही मी आभार मानते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मी आशीर्वाद घेईन.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घ्यावी, असे आवाहन दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या स्मरणार्थ केले, ज्यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक आवश्यक आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago