मुंबई

ब्रेकिंग! आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कडून क्लीन चिट

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला हाय-प्रोफाइल मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला गेल्या वर्षी मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आणि ड्रग्ज सापडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जामीन देण्यात आला.

‘पुराव्याअभावी’ सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले ‘अंतिम’ आरोपपत्र दाखल केले कारण आरोपपत्र दाखल करण्यासाठीची ६० दिवसांची मुदत 29 मे रोजी संपत आली होती. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नाही. आरोपपत्रात म्हटले आहे की आर्यनकडे कोणतेही ड्रग्स आढळले नाहीत.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणी आणि 26 दिवसांच्या कोठडीनंतर, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. शेवटी 30 ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कर्डिलिया ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात आणले आहे. एनसीबी हे आरोपपत्र कोर्ट रजिस्ट्रीमध्ये सादर करणार आहे. या आरोपपत्राची रजिस्ट्रीद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ते आरोपपत्र न्यायालयात न्यायाधीशांसमोर सादर केले जाईल.

या प्रकरणात एकूण 20 आरोपी होते, त्यापैकी 18 आरोपी जामिनावर बाहेर असून 2 आरोपी अजूनही तुरुंगात आहेत. अब्दुल शेख आणि चिनेदू इग्वे अशी कारागृहात असलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपपत्राचे एकूण 10 खंड असून ते सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. 6000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago