मुंबई

ड्रग्ज प्रकरण : अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा, शाहरुख खानच्या ‘मन्नत’ मध्येही सर्च ऑपरेशन

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. एनसीबीची टीम गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचली आहे. तसेच एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. एनसीबी टीम केवळ अनन्याच्या घरीच नाही तर शाहरुख खानचे घर मन्नतमध्येही सर्च ऑपरेशन करत आहे.

या प्रकरणात अनन्या पांडेचे नाव पुढे येणे हा मोठा खुलासा आहे. आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाबद्दल अनन्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप ड्रग चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी वृत्त होते की आर्यन खानने एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीसोबत ड्रग चॅट केले होते. आता असे समोर आले आहे की आर्यनने अनन्यासोबत ड्रग्ज चॅट केले होते.

चंकी पांडे आणि शाहरुख खानच्या मुलांमध्ये चांगले संबंध आहेत. ते सर्व एकमेकांचे मित्र आहेत. अनन्या पांडे ही शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची जवळची मैत्रीण आहे. अनन्याची आर्यन खान सोबत देखील मैत्री आहे. हे सर्व स्टारकिड्स एकत्र पार्टी, हँगआउट देखील करतात. अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

गुरुवारी सकाळी शाहरुख खान याने आर्थर रोड येथे मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर एनसीबीची टीम शाहरुख खानचे घर मन्नत येथे पोहोचली. मन्नतमध्ये आर्यन खानच्या रूममध्ये सर्च ऑपरेशन केले जाईल, असे सांगितले जात आहे. एनसीबी टीम कुटुंबातील अन्य सदस्यांचीही चौकशी करू शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago