मुंबई

आर्यन सुमारे 4 वर्षांपासून करतोय ड्रग्सचा वापर, चौकशीदरम्यान सतत रडतोय आर्यन खान

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांना एनसीबीने पकडले होते. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने या तीन आरोपींना एका दिवसाच्या एनसीबीच्या  कोठडीत पाठविले.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सतत चौकशी सुरु आहे. ड्रग प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर येत आहेत. नवीन माहितीनुसार, NCB च्या तपासात असे निदर्शनास आले आहे की आर्यन सुमारे 4 वर्षांपासून ड्रग्सचा वापर करत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने वरिष्ठ वकील सतीश मानशिंदे यांना आर्यनचे वकील म्हणून निवडले आहे. सतीश मानशिंदे अनेक बॉलीवूड सेलेब्सचे वकील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या सुरू असलेल्या चौकशीत आर्यन खान सतत रडत आहे. शाहरुख खान आणि आर्यन यांचे फोनवर बोलणे झाले आहे. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या लँडलाइन फोनवरून आर्यनला 2 मिनिटे आपले वडिल शाहरुख खानशी बोलू दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago