मुंबई

कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य‘ या संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओ, रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, चित्रीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, गायिका उतरा केळकर, कला व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने अद्याप काहीच नव्हतं, आणि म्हणूनच हे नाव देणे हे सर्वार्थाने योग्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ‘सुधीर फडके’ हे नाव निश्चित करण्यात आले. या संकुलाच्या निमित्ताने स्व. सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे नाव सुचविण्यापासून ते उभारणी पर्यंत विशेष मेहनत घेणार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

संकुलाची रचना

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलामध्ये ध्वनिमुद्रण कक्ष, आभासी चित्रीकरण (क्रोमा) कक्ष, पाच अद्ययावत संकलन कक्ष, रंगपट, पूर्व परीक्षण (प्रिव्ह्यू) दालन, व्हीएफएक्स व प्रशिक्षण वर्ग अशी रचना आहे.

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे महान संगीतकार तसेच भावगीत भक्तीगीतेतील अलौकिक स्वर गंधर्व स्वर्गीय सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही…: या गाण्याने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून स्व. सुधीर फडके यांच्या चिरंतन स्मृतींना वंदन केले. तसेच यावेळी गायक अजित परब, सोनाली कुलकर्णी, केतकी भावे-जोशी, अभिषेक नलावडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमात उत्कृष्ट बासरी वादनाचाही समावेश होता. खास सुधीर फडके यांना श्रद्धांजली म्हणून हा अनोखा सांगीतिक क्षण उपस्थितांना भावनिक करून गेला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले तर अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले. सूत्र संचालन कुणाल रेगे व संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago