मुंबई

एअर होस्टेस हत्या प्रकरण : पोलीस ठाण्याच्या शौचालयात आढळला आरोपीचा मृतदेह

मुंबई : एअर होस्टेस रुपल ओगरेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम अठवाल असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या शौचालयात ४० वर्षीय आरोपीचा मृतदेह त्याच्याच पॅन्टच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुंबई पोलीस हे प्रकरण संशयास्पद मानून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रायपूर येथील रहिवासी असलेली एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मृतदेह मुंबईतील मरोळ भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात पोलिसांनी सोसायटीचा सफाई कर्मचारी विक्रम अठवाल याला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी सुरु होती. मात्र दरम्यान शुक्रवारी सकाळी पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला.

काय आहे प्रकरण?
रुपल ओगरे सहा महिन्यांपूर्वी एका खासगी विमान कंपनीत फ्लाइट क्रू ट्रेनिंग कोर्ससाठी मुंबईत आली होती. तेथे ती मरोळ परिसरात एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. तिच्यासोबत तिची चुलत बहीणही राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती तेथून रायपूरला परतली होती. त्यानंतर रुपल तिथे एकटीच राहत होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा सोसायटीत सफाई कामगार म्हणून काम करत असे. अठवाल विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. अठवाल आणि रुपल यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वारंवार वाद व्हायचे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रविवारी कचऱ्याच्या पिशव्या घेण्याच्या आणि कमोड साफ करण्याच्या बहाण्याने आरोपी रुपलच्या फ्लॅटमध्ये घुसला आणि तिची हत्या केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago