After release from jail Navneet Rana admitted to Lilavati Hospital
मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांची अखेर सुटका झाली आहे. मात्र, तुरुंगात १२ दिवस राहिल्यामुळे नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. आता लिलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचे दुखणे आणि छातीत त्रास जाणवत आहे. काल जे.जे. रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती सुधारली नसल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून सुटका होणार आहे. त्यानंतर रवी राणा थेट लिलावती रुग्णालयात येतील.
नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात आणल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्याही दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी नवनीत राणा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या डॉक्टरांकडून नवनीत राणा यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. नवनीत राणा यांना कालपासून मानेच्या दुखण्याचा त्रास जाणवत आहे. त्यासाठी काल जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले होते. मात्र, आज नवनीत राणा यांना चालतानाही त्रास जाणवत होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…