food and drug administration
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. 18/10/2022 रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, 15, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषनासाठी घेऊन उर्वरित 400 किलो, किंमत रु. 2,99,090/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…