A Large Slab Of Sahyadri Guest House Collapsed Aaditya Thackeray Escaped
मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असल्याची माहिती मिळाली आहे.
सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संध्याकाळी पावणे पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. दरम्यान बैठकीच्या खोलीबाहेर असलेले शोभेचे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे आपल्या विभागातील काही महत्त्वाच्या विषयांवर बैठक घेत होते, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शोभेचे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. या घटनेमुळे खळबळ उडाली होती, पण सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सह्याद्री अतिथीगृहातील हे बांधकाम अंदाजे 20 ते 25 वर्षांपूर्वीचे आहे. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. या बांधकामाची तातडीने दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…