मुंबई

रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) यांनी व्हॉट्सअप क्रमांक ९९२०२४०२०२ व ई-मेल mh02.autotaxi complaint@gmail.com जारी केला आहे. प्रवाशांनी या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाहन क्रमांक, ठिकाण आणि गुन्ह्याचे स्वरूप अशा स्वरूपात तक्रार दाखल करावी, जेणेकरुन संबंधित दोषी वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करवाई करता येईल.

याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रार करण्यासाठी सु-मोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या २३ जून २०२३ रोजी सुनावणी दरम्यान आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याकरीता परिवहन विभागामार्फत प्रवाशांच्या तक्रारीकरीता व्हॉट्सअप क्रमांकाचे स्टिकर प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई यांनी व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago