मुंबई

मुंबई लोकलमधील गर्दी जीवावर बेतली, लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : आज (बुधवार) सकाळीच धावत्या लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जाताना ही घटना घडली.

लोकलमध्ये सकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. त्यात हा २२ वर्षाय तरुण दरवाजाजवळ उभा होता. गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान प्रवाशांचा धक्का लागल्याने हा तरुण धावत्या लोकलमधून खाली पडला. लोकलमधून तरुण खाली पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. प्रवाशांनी लगेच आरडा-ओरडा करत लोकल थांबवून तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. बोरीवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago