मुंबई

वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली, शोधमोहीम चालू

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका ३३ वर्षीय व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ही घटना पहाटे 3.45 च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3.45 वाजता पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील रहिवासी असलेला विनय यादव हा इनोव्हा कार चालवत सी लिंकवर आला. त्यानंतर सी लिंकच्या एका बाजूला गाडी उभी करून त्याने समुद्रात उडी मारली. मुंबई अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. यादव हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे.

याआधीही अनेकांनी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. गेल्या महिन्यात खार येथील एका व्यावसायिकाने सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago