मुंबई

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदन

मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago