मुंबई

डोंबिवलीतील धक्कादायक घटना, मोठा भाऊ रागावल्यामुळे १८ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

ठाणे : १८ वर्षीय तरुणीने मोठा भाऊ रागावल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाने बहिणीच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकले, आणि ते वारंवार वापरल्यामुळे आणि आई-वडिलांचे ऐकत नाही म्हणून बहिणीला शिवीगाळ केला, त्यामुळे एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतील शेलार नाका परिसरात घडली.

मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, 20 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…
पोलिसांनी सांगितले की, ती तरुणी गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस फोनला चिकटून राहत होती, त्यामुळे तिचा 22 वर्षांचा भाऊ तिला वारंवार ओरडत असायचा. गुरुवारी, तो तिच्यासोबत जेवत असताना, ती तिच्या फोनच बघत होती आणि त्याच्याशी बोलली देखील नाही. याचदरम्यान तिच्याकडून टेबलावरून पाण्याचा ग्लासही पडला. यामुळे तिचा भाऊ संतप्त झाला. त्याने कामावर जाण्यापूर्वी तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकले. पोलिसांनी सांगितले की, “भाऊ गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता घरी परतला तेव्हा त्याला दरवाजा लॉक केलेला आढळला. त्याने अनेकदा दार ठोठावले पण त्याच्या बहिणीने दार उघडले नाही. त्याने एक्झॉस्ट फॅनच्या गॅपमधून आत डोकावले, तेव्हा त्याला ती छताला रॉडला लटकलेली दिसली. त्याने तात्काळ पोलिसांना बोलावून तिला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago