महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. त्यानंतर काही अंतरावरच तीन कारनाही धडक दिली. पुढे थोड्याच अंतरावर आणखी एका कारला धडक दिली. त्यानंतर अन्य एका कारला धडकला. त्यानंतर ट्रेलर महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन कलंडला. ट्रेलरने एकूण चार वाहनांना धडक दिली.  या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी आयआरबी पट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याची यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा यांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.  तर अनिता सिंग (वय – ५४), अखिलेश सिंग (वय ५५, रा. रोसे – पारडे, पुणे) हे जखमी झाले आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघा जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago