accident
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक बसली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र देवले गावाच्या परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुढे जात असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगात धडकला. या धडकेत टेम्पोच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला आहे. जखमींवर सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…