custody of child handed over to adoptive parents
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं मुलाच्या भवितव्याचा विचार करत त्याचा ताबा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा त्याच्या दत्तक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेल्या आईवडिलांना देणे संयुक्तिक ठरेल, असं निरीक्षण नोंदवत अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. तसेच मुलाचा ताबा सख्या आई वडिलांना देण्यास नकार दिला, ज्यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या लहान बाळाला एका जोडप्याला दत्तक दिले होते. ते मूल सहा वर्ष त्याच्या दत्तक पालकांकडेच असून आता भावनिकरित्या त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे आता त्याला त्या वातावरणातून बाहेर काढणं योग्य ठरणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे.
मुलाचे जन्मदाते वडील रिक्षा चालक आहेत. त्यांच्या विवाहबाह्य सबंधातून या मुलाचा जन्म झाला होता. त्यामुळे जन्माला आल्यावर दुस-याच दिवशी त्यांनी या मुलाला दत्तक दिलं होतं. मात्र काही वर्षानी संबंधित अविवाहित तरुणी आणि रिक्षावाले वडील यांनी एकत्र राहायचं ठरवलं. त्यांना एक मुलगीही झाली. संपूर्ण कुटुंब एक झाल्यामुळे त्यांनी हा दत्तक दिलेला मुलगा पुन्हा मिळण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला. मात्र हा दावा न्यायालयाने नामंजूर केला आणि मुलाचा ताबा त्याला ज्यांनी दत्तक घेतलं होतं, त्या पालकांनाच दिला. त्याविरोधात जन्मदात्या पालकांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर आणि न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी यांच्या बेंचनं मुलाच्या उज्वल भविष्यासाठी त्याचे दत्तक पालकच योग्य असल्याचं स्पष्ट केलं.जन्मदाते वडील रिक्षा चालक आहेत, त्यांच्या विवाहबाह्य संबंधातून या मुलाचा जन्म झाला आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून आधीच दोन मुली आहेत. तर दत्तक वडील व्यापारी असून दत्तक आई डॉक्टर आहे. या दत्तक पालकांना स्वत:चं मूलबाळ नाही. त्यांनी या मुलाचं आजवर स्वत:च्या मुलासारखंच पालनपोषण केलं आहे. तिथे मुलाचं संगोपन अत्यंत योग्य प्रकारे सुरू आहे. मुलगा त्याच्या दत्तक आई वडिलांबरोबर मानसिक आणि भावनिकरित्या एकरूप झाला आहे. त्यामुळे जन्मदात्या पालकांपेक्षा मुलगा दत्तक घरात अधिक योग्य परिस्थितीमध्ये असून त्याच्या भविष्याच्या दृष्टीने तो आता त्यांच्याकडेच राहणं योग्य आहे, असं महत्त्वपूर्ण निरिक्षण हायकोर्टानं या निकालात नोंदवलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…