Uddhav Thackeray
मुंबई : MPSC ची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण कोविडच आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. त्यांची चाचणी करणं गरजेचं आहे. ज्यांना लस दिली आहे, त्यांनाच इथे नेमलं जाईल. ही माझी सूचना आहे.”
एमपीएससीच्या परिपत्रकानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. परीक्षा झालीच पाहिजे या मागणीवर विद्यार्थी ठाम होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये परीक्षा होणार होती, परंतु ती लांबणीवर पडली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…