Supriya Sule
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ते सध्या विलगीकरणात राहत आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, सदानंद आणि मी, आम्हा दोघांची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आमच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची चाचणी घ्यावी ही विनंती. काळजी घ्या.
दरम्यान, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वर्षा गायकवाड अधिवेशनात देखील उपस्थित होत्या.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…