महाराष्ट्र

अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल, राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पुणे : मान्सून अंदमानच्या समुद्रात आज येऊन धडकल्याचे हवामान खात्याने सांगितले. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 2 दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये 16 ते 19 मेच्या दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता असून राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याने यंदा वेळेच्या अगोदर पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशामध्ये वेळेअगोदरच दाखल झाला आहे. मान्सून अगोदर केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकणार आहे. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून दिवशी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेच्या अगोदर म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago