महाराष्ट्र

धक्कादायक! 17 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अत्याचार

यवतमाळ : शाळेतून घरी परतणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २८ जुलैला आर्णी तालुक्यातील जवळा येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोनही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी पीडित १७ वर्षीय तरुणी शाळेतून घरी परतत होती, त्यावेळी दोन तरुणांनी या विद्यार्थीनीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला धमकी दिली की याविषयी कुठे वाच्यता केली तर तिला जिवे मारण्यात येईल. पीडित तरूणीने ५ ऑगस्ट रोजी आर्णी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये तसेच बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करून घेतली. त्यानुसार, कारवाई करत पोलिसांनी आकाश प्रकाश डोमकावळे (२५) व धीरज विलास व्यवहारे (२४) या दोन आरोपींना अटक केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago