महाराष्ट्र

मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉट्सॲप चॅनेलवर; व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

मुंबई : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्त्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन मंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

चॅनेलला असे करा फॉलो :
व्हॉटसॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va9ERCr4NViuAvsdCI14 या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago