महाराष्ट्र

डॉ सुनील गायकवाड यांनी घेतली पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट

लातूर : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. लातूर हे शैक्षणिक हब असलेले ठिकाण आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी तयार करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस डेपो च्या पश्चिम दिशेस असलेल्या खाडी मध्ये एक हजार बैठक व्यवस्था असलेले वातानुकुलित नाट्यगृह किंवा सभागृह बांधावे, लातूरच्या विमान तळावर नाईट लँडिंग ची सोय करावी अशा मागण्या माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

माननीय पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. लातूर जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेले अनेक सरकारी कामे पूर्ण करावीत अशी ही विनंती माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केली आहे.
माननीय पालकमंत्री यांनी दोन वर्षाचा कालावधी चांगलं काम करून पूर्ण केल्याबद्दल सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लोकहिताच्या कामाची मागणी करून सध्या जरी खासदार नसले तरी ही लोकप्रतिनधींनी लोकांसाठी काम केले पाहिजे असे उदाहरण त्यांच्या या भेटी मुळे लोकांना लोकप्रिनिधींना दिले आहे.
सत्ता कुणाचीही असो जनतेच्या विकासाची कामे झाली पाहिजेत हेच या भेटीतून जनतेला संदेश दिला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago