महाराष्ट्र

परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत डॉक्टरांबरोबरच परिचारिकाही सतत काम करीत आहेत. परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग वित्त विभागाकडे पाठपुरावा करेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गंत कार्यरत परिचारिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या परिचारिका प्रतिनिधी उपस्थित होत्या. अमित देशमुख म्हणाले की, परिचारिका या सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करीत असतात. त्यामुळे त्यांना अनुज्ञेय असलेले भत्ते, धुलाई भत्ता आणि इतर अनुषंगिक भत्ते वेळोवेळी मिळणे आवश्यक आहे. आपण स्वत: यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करु.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत लवकरच अधिपरिचारिका संवर्गामध्ये भरती करण्यात येणार आहे. तसेच परिचारिकांना रुग्णालयात लागणारे साहित्य, वस्तू, यंत्रसामुग्री सर्व संस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परिचारिकांना मदतनीस म्हणून अनेक चतुर्थश्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते त्यामुळे या विभागामार्फत लवकरच चतुर्थश्रेणीची रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मुभा देण्यात आल्याची माहितीही यावेळी त्यांनी परिचारिकांना दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago