महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

मुंबई : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

  • विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
  • कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
  • बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  • आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
  • ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक आहे.

सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago