महाराष्ट्र

कॅसिनो कायदा अखेर रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कॅसिनो कायदा रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. यासोबत गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकाला एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा सरकारकडून पुरवण्यात येणार आहे.

राज्यातून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 1976 पासून राज्यात हे विधेयक अस्तित्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधायक रद्द करण्याची घोषणा केली होती. राज्यात कॅसिनो सुरू करावा यासाठी अनेक जण कोर्टात गेलेले आहेत, मात्र त्याआधीच राज्य सरकारने हा अधिनियम रद्द केला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय

  1. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. पाच हजार कोटीचा प्रस्ताव
    (आदिवासी विकास विभाग)
  2. गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा पुरवणार
    (अन्न व नागरी पुरवठा)
  3. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार
    (कौशल्य विकास )
  4. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
    (महसूल विभाग)
  5. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
    (गृह विभाग )
  6. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला
    (महिला व बाल विकास)
  7. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे
    (सहकार विभाग )
  8. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
    (विधी व न्याय विभाग )
  9. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय
    (विधी व न्याय विभाग)
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago