महाराष्ट्र

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने राऊतांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारला प्रश्न..

‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले तरी त्यांना काही कळत नाही. माझ्या मते डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरकडून औषध घेत नाही, कम्पाऊंडरकडून घेतो,’ असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनं (MARD -Maharashtra Association of Resident Doctors) राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

एकीकडे डॉक्टरांना करोना योद्धे म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वक्तव्यं करायची याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अनेक दिवसांपासून घरी न जाता, आईवडिलांचे तोंडही न पाहता जिवाची बाजी लावून अनेक डॉक्टर काम करत आहेत. डॉक्टरांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ते हे ऐकण्यासाठीच का? डॉक्टरांना काही कळत नसेल तर सरकारने डॉक्टरांचे कृती दल कशासाठी तयार केले,’ अशी विचारणा ‘मार्ड’नं पत्रातून केली आहे.

राऊत यांनी केलेलं वक्तव्य तरुण डॉक्टरांचं खच्चीकरण करणारं आहे. आपली सुद्धा अशीच अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न ‘मार्ड’नं केला आहे. तसं नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा, त्यांनी मांडलेली भूमिका हीच आपली अधिकृत भूमिका आहे, हे गृहित धरून डॉक्टर रस्त्यावर उतरतील,असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago