Indian post
मुंबई : पोस्ट विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक भरती सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/ ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण २,४२८ पदांची भरती सुरु आहे. (अजा-१९१, अज-२४४, इमाव-५६५, इडब्ल्यूएस-२४६, दिव्यांग(ए)- १०, दिव्यांग(बी)- २३, दिव्यांग (सी)-२९, दिव्यांग (डी ई)-१५, खुला-११०५)
पदनिहाय काम :
पात्रता :
उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना कोणतंही प्राधान्य देण्यात येणार नाही. ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपल्या कार्यक्षेत्रात ब्रँच पोस्ट ऑफिससाठी निवड झाल्यानंतर व कामास सुरूवात करण्यापूर्वी जागा मिळवून द्यावी लागेल. उमेदवार एका वेळेला सर्कलमधील २० पदांसाठी एकच ऑनलाइन अर्ज करू शकतील, त्या प्रत्येक पदासाठी पसंतीक्रम देणं आवश्यक आहे. विभागानुसार रिक्त पदांचा तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहे.
वयोमर्यादा :
१८ ते ४० वर्षं (इमाव- ४३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ४५ वर्षांपर्यंत, विकलांग उमेदवार- खुला गट- ५० वर्षांपर्यंत, इमाव- ५३ वर्षांपर्यंत, अजा/अज-५५ वर्षांपर्यंत). EWS उमेदवारांना वयात कोणतीही सूट नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपलं नाव http://appost.in/gdsonline या वेबसाइटवर २६ मे २०२१ पर्यंत रजिस्टर करायचं आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे.
हेल्पलाईन नं. ०२२-२२६२६२१४
ई-मेल– gdsrectt.mah@gmail.com
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…