Maharashtra is the most beneficiary under self-reliant India employment scheme
नवी दिल्ली, दि. 13 डिसेंबर : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वलस्थानी असल्याची माहिती आज केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार महाराष्ट्रातून एबीआरवाय मधून सर्वाधिक लाभ घेतला असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकूण 17,524 कंपन्यांमधील 6,49,560 कर्मचाऱ्यांनी 4,09,72,34,366 इतकी रकम वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या कालावधीत उचलली आहे. महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, कर्नाटक या राज्यातील कामगारांनी रकम उचलली आहे.
केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) दाव्यांच्या निपटाऱ्यांची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जानेवारी 2020 मध्ये सुरु केली होती.
महामारी, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीच्या वेळी इपीएफ सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी इपीएफओ मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…