महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पातील तरतुदी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज (८ मार्च) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली.

अर्थसंकल्पातील तरतुदी :

  1. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार. औंध येथे रुग्णालय, राज्यात आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक लॅब , १५० रुग्णालयात कर्करोग निदानासाठी सुविधा देणार. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक, साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत.
  2. तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. शेततळी, विहिरी यासाठी १२३१ कोटीची तरतूद
  3. राज्यातील आठ प्राचिन मंदिरांचा विकास करण्यासाठी १०१ कोटींची तरतूद
  4. अल्पसंख्यांक विभागासाठी ५८९ कोटी तसेच इतर मागास विभाग व बहुजन विकास विभागासाठी ३२१० कोटींची तरतूद
  5. सारथी, बार्टी सारख्या योजनांसाठी प्रत्येकी १५० कोटी, गरज पडल्यास आणखी मदत करण्यात येईल.
  6. आदिवासी विकास विभागासाठी ९७३८ कोटींची तरतूद
  7. पुण्यात साखर उद्योगाच्या बदलांचा आढावा घेणारे साखर संग्रहालय उभारणार
  8. पर्यटन विभागासाठी १३६७ कोटींची तरतूद
  9. गृह विभागासाठी १७१२ कोटींची तरतूद
  10. राज्य राखीव पोलीस दलात पहिल्यांदाच महिला पोलीसांच्या तुकडीची घोषणा करण्यात आली.
  11. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिलेच्या नावे घराची नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार
  12. राज्यात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक, ३ लाख रोजगार निर्माण होणार
  13. नगर विकास विभागाला ८४२० कोटींची तरतूद
  14. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, ४५० कोटींचा खर्च, मार्चपासून कामाला सुरुवात, मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास
  15. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता
  16. ठाणे खाडीला समांतर कोस्टल रोडसाठी १२५० कोटींचा खर्च अपेक्षित
  17. उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी १३९१ कोटी
  18. घरकुल योजना राबवण्यासाठी गेल्या वर्षात २९२४ कोटी खर्च तर पुढील आर्थिक वर्षासाठी ६८२९ कोटीची तरतूद
  19. एसटी बस आगारांच्या विकासासाठी १४०० कोटींची तरतूद
  20. ईस्टर्न फ्रिवे आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार
  21. मदत आणि पूर्नवसन विभागासाठी १३९ कोटी
  22. गोसीखूर्द प्रकल्पासाठी १००० कोटी
  23. सागरी महामार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च
  24. पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाला २५३३ कोटी
  25. जलसंपदासाठी १२९5१ कोटींची तरतूद
  26. सहकार व पणन विभागासाठी 1284 कोटींची तरतूद
  27. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मत्स्य उद्योगाच्या विकासासाठी दरवर्षी १०० कोटीचा निधी असे तीन वर्ष देण्यात येणार
  28. एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद
  29. वन विभागास १७२३ कोटींची तरतूद तर पर्यावरण विभागास २२७ कोटींची तरतूद
  30. सुंदर माझे कार्यालय अभियान राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागास १०३५ कोटी
  31. ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात 25 कोटींत आणखी 10 कोटींची भर
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago