महाराष्ट्र

दुर्दैवी! सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थाचा धबधब्यावर पाय घसरला, दीड हजार फूट उंचावरून खडकावर आपटून मृत्यू

नाशिक : साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथे घडली आहे. पिंपळसोंड उंबरपाडा येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ हा अपघात घडला. सुरत येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमारे दीड हजार फूटांवरुन पाय घसरुन पडून खडकावर आपटल्याने पर्यटक विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. हा विद्यार्थी गुजरात राज्यातून आपल्या महाविद्यालयातील दहा ते बारा मित्रांसमवेत आला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती ( वय १८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

तक्षिल हा सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे तो सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास हे सर्व जण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर आंघोळ करीत होते. यावेळी खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन पंधराशे फूट खाली पडून खडकावर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच पोलीस व वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजताच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तसेच वन विभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago