महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत कोसळल्याची घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी घडली. या दुर्घटनेतील मदत व बचावकार्य पूर्ण झाले असून दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, ज्यात पाच पुरुष, तीन महिला आणि एक बालकाचा समावेश आहे.
ही निवासी इमारत कोसळल्यानंतर स्थानिक बचाव पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी मदत व बचावकार्य सुरु केले होते. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तळ ठोकून होत्या.
महाड तारीक पॅलेस इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; १८ ते १९ जण बेपत्ता
२४ ऑगस्टला आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. यात एकाचा मृत्यू झाला होता. २५ तारखेला मध्यरात्री एक वाजेपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी मदत व बचाव कार्याचा ताबा घेतला. दुपारी बारा वाजल्यानंतर टप्प्या-टप्प्याने १५ मृतदेह हाती लागत गेले. चार वर्षाचा मोहम्मद बांगी याला दुर्घटनेच्या १९ तासांनंतर तर ६० वर्षाच्या मेहरुनीसा अब्दूल हमीद काझी यांना २६ तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आज सकाळी दहा वाजेपर्यंत उर्वरीत दोन बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यानंतर हे मदत व बचावकार्य थांबविण्यात आले. सलग ४० तास हे मदत व बचावकार्य सुरु होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…