महाराष्ट्र

महा हॅकेथॉन चॅलेंज १.० स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : माहिती तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य गण आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या भाषिणी यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत टेक्नॉलॉजी इनोव्हेटर्स, रिसर्चर आणि आंत्र्यप्रुनर्स, स्टार्टअप्स यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी विषय

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासनात वापर, आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, प्रतिबंधीत क्षेत्रात ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर, भाषिणीचा वापर करुन थेट स्पीच अनुवाद असे या स्पर्धेसाठी विषय आहेत.

स्पर्धा वेळापत्रक

  • स्पर्धेचे उद्घाटन ११ फेब्रुवारी २०२५
  • स्पर्धकांच्या शंका समाधान १४ फेब्रुवारी २०२५
  • नोंदणीची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५
  • सादर केलेल्या कल्पनांचे तपशीलवार मुल्यांकन आणि दहा गटांची निवड २८ फेब्रुवारी २०२५
  • प्रत्येक गटातील पहिल्या पाच संघांची निवड ७ मार्च २०२५
  • अंतिम सादरीकरण आणि प्रत्येक गटातील तीन विजेत्या संघाची निवड २० मार्च २०२५
  • विजेत्यांची घोषणा २५ मार्च २०२५ .

बक्षिसाचे स्वरूप

प्रत्येक गटातील प्रथम तीन संघांना त्यांचे सोल्युशन इंम्प्लिमेंट करण्यासाठी फंडिंग आणि सपोर्ट मिळेल. पहिल्या तीन गटांसाठी पंधरा लाख रुपये आणि प्रमाणपत्र तर चौथ्या गटांसाठी पाच लाख रुपये आणि प्रमाणपत्र.

विजेत्या सोल्युशनना महाराष्ट्र शासनाच्यावतीने ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी नियुक्त केले जाईल. यामध्ये पहिल्या तीन गटांना दीड लाख रुपये प्रति वर्ष तर चौथ्या गटांसाठी पन्नास हजार रुपये प्रति वर्ष दिले जाणार.

अधिक माहितीसाठी संपर्क:

https://bhashini.gov.in/sahyogi/startup/maha-innovation

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

21 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago