Lokneta Balasaheb Thorat honored with the prestigious Sahakartirth Gulabrao Patil Award for his exceptional contributions to politics, society, education, and cooperation.
अश्विनी गिते, पुणे : राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अपार योगदानाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांना “सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील भावे नाट्यमंदिरात आयोजित एक सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते थोरात यांना हा सन्मान मिळणार आहे, अशी माहिती संस्थापक चेअरमन पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. थोरात यांना यावर्षीचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व आणि सहकार चळवळीतील अग्रगण्य नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टकडून दिला जातो. या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित केले जाते. सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्काराने याआधी अमृत उद्योग समूहाचे संस्थापक व स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले होते.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये कृषी, महसूल, शिक्षण, जलसंधारण यांसारख्या महत्त्वपूर्ण खात्यांमध्ये केलेल्या ऐतिहासिक व पायाभूत कार्यांमुळे राज्याला नवी दिशा मिळाली. त्यांचे कार्य विशेषत: संगमनेर शहर व तालुक्याच्या पायाभूत विकासामध्ये दिसून आले आहे. तसेच निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामांमुळे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यात आले आहे.
थोरात यांना यापूर्वीही विविध प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत, त्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण पुरस्कार यांचा समावेश आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…