महाराष्ट्र

गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटुंबासाठी ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, उपजीविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान ऊंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजीविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजीविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.

३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन, त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो. ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.

२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट होईल. तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago