महाराष्ट्र

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंस्कृती व्हेंचर्सच्या संस्थापक संचालक शिल्पा परांडेकर, संचालक ऋतुराज हेसी आदी यावेळी उपस्थित होते. केसरकर यांच्या हस्ते यावेळी कोकणातील संस्कृती दर्शविणाऱ्या ‘द अनएक्सप्लोरड् लेगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मंत्री केसरकर म्हणाले, कोकणचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. जंगल, किल्ले, समुद्र किनारे असा विविधांगी सर्वोत्तम निसर्ग कोकणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन समुद्री किल्ले उभारले. जेवढे बॅक वॉटर केरळमध्ये आहे तेवढे कोकणातही आहे. कोकणवासियांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्या भूमीने जन्म दिला ते मातृऋण कधीतरी फेडावे लागते. महासंस्कृती व्हेंचर ते काम करीत असल्याबद्दल कौतुक करून कोकणचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. कोकणातील संस्कृतीचा वारसा दाखविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago