महाराष्ट्र

ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती

ॲमस्टरडॅम /मुंबई : दुग्ध उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, इंग्लंड या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. त्याचे नेतृत्व डॉ. गोऱ्हे करीत आहेत. आज ॲमस्टरडॅम येथे भारताच्या राजदूत श्रीमती रिनत संधू तसेच तेथील कृषी मंत्रालयातील अधिकारी फ्रेडरिक वोसेनोव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या अभ्यासभेटीत आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, नैसर्गिक जलस्त्रोत संवर्धन, शिक्षण, दुग्ध प्रक्रिया या क्षेत्रांशी संबंधित विषयांवर शिष्टमंडळ सदस्यांनी माहिती जाणून घेतली.

ॲमस्टरडॅम येथील स्थानिक स्व-शासन संस्थेतील सदस्य प्राची कुलकर्णी यांनी तेथील स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील राज्य व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. मनीषा कायंदे, अभिजित वंजारी, मनीषा चौधरी, सीमा हिरे, प्रज्ञा सातव, मनोहर चंद्रिकापुरे यांनी सहभाग घेतला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते भारताच्या राजदूत श्रीमती संधू तसेच सर्व मान्यवरांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या खूर आणि लाळ रोगांवरील लस निर्मितीसंदर्भात वडील डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांचे योगदान, नेदरलँड्सने त्यावेळी घेतलेला पुढाकार या आठवणींना डॉ. गोऱ्हे यांनी उजाळा दिला.

यावेळी नेदरलँड्स येथील मराठी मंडळाचे शिवम जोशी, अमेय धायगुडे, वैशाली नार्वेकर, ऋतुजा केळकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago