महाराष्ट्र

महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन म्हणजेच न्याय मिळविण्यासाठीची पहिली पायरी

मुंबई : कायदेविषयक मार्गदर्शन करणे म्हणजेच महिलांना न्याय मिळवण्यासाठी सहाय्य करण्याची पहिली पायरी असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कायदेविषयक विनामूल्य सल्ला देणारे केंद्र (Legal Aid Clinic) शुभारंभ कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील लीगल एड क्लिनिकचे लोकार्पण झाले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रेखा शर्मा, राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण, ॲड. सुप्रदा फातर्पेकर, गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी. पी. सुराणा उपस्थित होते.

उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महिलांचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे आहेत. हे कायदे आणि त्याची माहिती सर्व महिलांना होणे गरजेचे आहे. कायद्याचे मराठी भाषेत भाषांतर झाल्यास महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळण्यास मदत होईल. महिलाविषयक तक्रारी पोलिसांनी संवेदनशीलपणे हाताळल्या पाहिजेत. महिलांचा समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभाग वाढावा, यासाठी महिलांनी पुढे यावे.

कायदेशीर सल्ला केंद्रामुळे पीडित महिलांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तत्पर मदत मिळण्यास मदत होईल – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्र (Legal Aid Clinic) हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळण्यास मदत मिळेल. महिलांविषयी प्राप्त तक्रारी शून्य होतील. असे आयोगाच्या माध्यमातून काम करावे.

राष्ट्रीय महिला आयोगाचे सहकार्य मिळाल्यामुळे राज्यात कायदेविषयक सल्ला विनामूल्य देणारे केंद्र सुरू करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे. महिला आयोगाने आलेल्या तक्रारी ऑनलाईन घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मंत्री लोढा यांनी व्यक्त केली.

राज्यांच्या सहकार्यातून गावपातळीपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहोचवणार – रेखा शर्मा
श्रीमती शर्मा म्हणाल्या की, कायदेशीर सल्ला केंद्र मोफत करून देशभरातील प्रत्येक गावागावात महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. मोफत कायदेशीर सल्ला मिळाल्यामुळे महिलांना एक प्रकारे आपण पाठबळ देणार आहोत. महिलांमध्ये कायदेशीर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.

महिलांच्या कायदेशीर लढाईत आयोगाची साथ मिळेल – रुपाली चाकणकर
श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कौटुंबिक त्रास, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, मालमत्ताविषयक तसेच सामाजिक विषयांशी निगडित विविध तक्रारी घेऊन महिला मोठ्या प्रमाणावर येत असतात. आयोगात कार्यरत समुपदेशक अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनाने मार्ग काढून महिलांना दिलासा देत असतात. नव्याने सुरू केलेल्या कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्रा (Legal Aid Clinic) मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्य मिळणार आहे. महिलांविषयक कायद्यांची माहिती, त्यांचे हक्क, न्यायालयातील प्रक्रियेची माहिती, कागदपत्रे तयार करण्यासाठी तज्ज्ञ वकिलांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष न्यायालयात जाण्यापूर्वी आयोग स्तरावरच महिलेला न्याय मिळावा, यासाठी कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्र प्रयत्नशील राहील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago